Breaking

Friday, 18 March 2022

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी /अक्षय खंदारे - टेंभूर्णी प्रेस क्लबच्या वतीने महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणार्या महिलांचा सन्मान.


टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा केला सन्मान.
टेंभुर्णी प्रतिनिधी :- कुटुंबातील संवाद कमी झाला असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तरूण युवक बिघडू लागली आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकांमध्ये सुसंवाद असणे गरजेचे असून सर्वांनी महिलांच्या विचारांचा सन्मान केला पाहीजे. त्यांना समान वागणूक दिली तरच आजच्या काळात कुटुंबाची प्रगती होईल असे मत ज्येष्ठ साहित्यिक तथा विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. महेंद्र कदम यांनी व्यक्त केले. 

टेंभुर्णी प्रेस क्लब यांच्या वतीने टेंभुर्णी शहर व परिसरात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात परिक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्यांचा सन्मान टेंभुर्णीतील रोटरी क्लब येथे करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डाॅ. कदम बोलत होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे उपस्थित होते. 

प्राचार्य डॉ.महेंद्र कदम म्हणाले, काळ खूप झपाट्याने बदलतोय. ज्या माणसाची ऐंशी टक्के शक्ती घरासाठी खर्च होते तो माणूस समाजासाठी काही करू शकत नाही. कौटुंबिक जबाबदारी महिलांनी घेतल्यानंतरच पुरूष मोकळेपणाने काम करू शकतात ही वस्तुस्थिती आहे. आर्थिक संपन्नता आली की चैन करतो ही मानसिकता बदलण्याची गरज असून मुलांवर चांगले संस्कार,शिक्षणासाठी पैसे खर्च होणे आवश्यक आहे. शहाजी राजांनी जिजाऊंना स्वातंत्र्य दिल्यामुळेच त्या सक्षमपणे उभ्या राहिल्या. महिलांचा सन्मान ही भारताने जगाला दिलेले देण आहे संवादाने अनेक प्रश्न सुटतात. भारत अधिक सक्षम करायचा असेल तर कुटुंबातील महिलांच्या सन्मानापासून सुरूवात करावी.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी  एस.गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये टेंभुर्णी प्रेस क्लबने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचे सांगून प्रत्येक महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले यावेळी सविता जगताप, प्रा. मीनाक्षी जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

        यांचा झाला सन्मान 
शीला पाटील, सूरजा बोबडे, प्रा. उषा पाटील, स्वाती पाटील भीमानगरकर, जयश्री वाकसे, प्रा. मीनाक्षी जगदाळे, सविता जगताप, शीतल छोरिया-कोठारी, भाग्यश्री पाडे- पाटील , रेखा गाडेकर, अकोलेखुर्दच्या सरपंच रूपाली नवले , दहिवलीच्या सरपंच कैसर जहागीरदार, अतुल पाटील, अंकुश गोसावी, रंजना गोसावी 

या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, माजी उपसभापती तुकाराम ढवळे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रावसाहेब देशमुख, शहरप्रमुख सुरेश लोंढे, गोरख देशमुख, दिपक खोचरे, सोमनाथ कदम, महेश कोठारी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ढेकणे, अमोल जगदाळे, राजाराम येवले, धनंजय गोंदिल, गणेश केचे, विजय खटके, संदीप मोकाशी,राहूल आरडे, राहुल चव्हाण, विशाल नवगिरे, भारत माने, अरूण चव्हाण, जयवंत पोळ, परमेश्वर खरात, विकास धोत्रे, सुनिल मिस्कीन,राम पवार, रमेश देशमुख, गणेश व्यवहारे, सुभाष इंदलकर, विठ्ठल मस्के, राहूल चव्हाण, राजकुमार धोत्रे,अनिल पवार,विजय कोकाटे, छाया जाधव, हवाबी मुलाणी, सुवर्णा भोसले, उल्फत मुलाणी, स्मिता पालांडे, अंजली अरगडे, आदी उपस्थित होत्या. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल जगताप, सचिव सुरज देशमुख,उपाध्यक्ष सतीश चांदगुडे, डी एस.गायकवाड, संतोष पाटील, सदाशिव पवार,सोपान ढगे, सचिन होदाडे, सतीश काळे, गणेश चौगुले यांनी परिश्रम घेतले. आभार सतीश चांदगुडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment