Breaking

Friday, 18 March 2022

माढा तालुका प्रतिनिधी /मदन मुंगळे - सचिन बापू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वेदांत क्लिनिकल लॅबोरेटरी पिंपळनेर च्या वतीने रक्तगट तपासणी शिबिर संपन्न.


*सचिनबापू जगताप यांच्या वाढदिसानिमित्त वेदांत क्लिनिकल लॅबोरेटरी,पिंपळनेर च्या वतीने रक्तगट तपासणी शिबिर संपन्न*

संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन बापू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे मा.विद्यालय, सापटणे (टें.) या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. वेदांत क्लिनिकल लॅबोरेटरी, पिंपळनेर ता. माढा यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मा.एच.एन.ढवळे सर यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमा पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी संभजी ब्रिगेड चे पिंपळनेर विभागप्रमुख शिवश्री अभयसिंह पाटील,विद्यार्थी आघाडी चे तालुकाध्यक्ष तथा वेदांत लॅब चे शिवश्री शंकर नागणे ,वेदांत लॅब चे असिस्टंट गणेश ठाकूर,सौरभ लोंढे यांच्यासह प्रशालेचे शिक्षक,विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर शिबिरातून १६९ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करून देण्यात आली.

No comments:

Post a Comment