सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुक्यातील मौजे बावी हे गाव ठरतंय कोरोनाचे हाॅट स्पाॅट केंद्र- याबाबत वृत्त असे की माढा तालुक्यातील मौजे बावी या गावात दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे आणी बावी गावची सध्या कोरोनाचे हाॅट स्पाॅट केंद्राच्या दिशेनं वाटचाल
सुरू असल्याचे मत अनिल नाना मोरे यांनी सांगितले आहे, सध्या बावीत दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे व दोन दिवसात 4 रूग्ण दगावले आहेत, तसेच टेस्टिंग किटचा तुटवडा निर्माण झाला असून 115 रूग्ण संख्या असलेल्या बावीत गेल्या 5 दिवसांपासून टेस्टिंग किट नसल्याने, टेस्टिंग किट उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी होत आहे, तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी चांगले काम करत असून बावीतील टेस्ट वाढविण्याची गरज आहे, व याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच कोरोना पाॅझीटीह्व रूग्णांना औषधे ही बावीतच मिळावीत व लसीकरणाचा डोसही लवकरात लवकर मिळवा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य DM मोरे, अनिल नाना मोरे, नंदकुमार मोरे, सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment