Breaking

Friday, 3 June 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- कुर्डूवाडी येथील पंचायत समिती मधील, कृषी विभागातील कृषी विस्तार अधिकारी गावडे एक हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- कुर्डूवाडी येथील पंचायत समिती मधील कृषी विभागातील कृषी विस्तार अधिकारी गावडे एक हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात- याबाबत वृत्त असे की जिल्हा परिषद कृषी विभागातील डीबीटी योजनेअंतर्गत कडबाकुट्टी साठी अर्ज केलेल्या अर्जदारास तुमचा बॅंक अकाऊंट नंबर चुकला आहे असे सांगून अकाऊंट नंबर दुरूस्त करण्यासाठी एक हजाराची लाच घेताना कृषी विस्तार अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

संदीप रामदास गावडे, वय 45 वर्ष, पद-कृषी विस्तार अधिकारी, कृषी विभाग पंचायत समिती कार्यालय कुर्डूवाडी ता.माढा, जि.सोलापूर, असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव आहे.
यामधील तक्रारदार यांनी त्यांचे वडील यांचे नावे जिल्हा परिषद सेस अंतर्गत डीबीटी योजनेअंतर्गत कडबाकुट्टी मशीन साठी अनुदान मिळणेकरीता कुर्डूवाडी पंचायत समिती, कृषि विभाग येथे अर्ज केलेला होता, व सदर अर्जाचा पाठपुरावा यातील तक्रारदार करत असताना, संदीप गावडे, कृषी विस्तार अधिकारी, कुर्डूवाडी पंचायत समिती, कृषी विभाग यांनी सदर अर्जामधील  अकाऊंट नंबर चुकला असल्याचे सांगून तो दुरूस्त करण्यासाठी 1000 रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 500 रूपये स्विकारण्याचे मान्य करून सदर लाच रक्कम कुर्डूवाडी पंचायत समिती, कृषी विभाग कार्यालयात स्वतः स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 
ही कारवाई उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, एसीबी सोलापूर, पोलीस अंमलदार/ पोना/ अतुल घाडगे,पोकाॅ/ स्वप्निल सन्नके, पोकाॅ/ गजानन किणगी सर्व नेम.एसीबी सोलापूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.

No comments:

Post a Comment