बार्शी येथे दुचाकीवरून चोरट्याने महिलेचे गंठण लांबवले,दोन अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल- पतीची वाट पाहत रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किंमतीचा सोन्याचा गोप जबरीने खेचून तोडून दुचाकीवरून पोबारा केल्याचा प्रकार बुधवार दि.22 भर दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील कासारवाडी रस्त्यावर घडला.याबाबत धनश्री प्रमोद देशमुख वय 42 वर्ष, रा.साई मंदीराशेजारी, कासारवाडी रोड ता. बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोन आज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.
बार्शीतील सुभाषनगर भागात नातेवाईकाच्या घरी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी दि.22/12/2021 रोजी या तिकडे जाण्यासाठी दुपारी 12 वा.सुमारास घरातून पायी बाहेर निघाल्या, त्यानंतर 12:30 वाजण्याच्या सुमारास कासारवाडी रस्त्यावरील एका हाॅस्पीटल जवळील काॅर्नरवर असलेल्या एका किराणा दुकानाच्या बाहेर पतीची वाट पाहत थांबल्या, त्याचवेळी तेथे एका काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून दोन अनोळखी इसम दुकानासमोर येऊन थांबले, त्यापैकी एक इसम दुकानात जाऊन दुकानात सामानाची खरेदी करू लागला, व दुचाकीस्वार इसम हा दुचाकी जवळच थांबला, थोड्या वेळाने त्यांच्या पाठीमागून गळ्यातील सोन्याचे गंठण कोणीतरी जोराने ओढू लागला, त्याच वेळी जोराने ओरडून पाठीमागे बघीतले असता,दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या अनोळखी इसमाने गळ्यातील गंठण जबरीने खेचून पळत जावून दुकानाबाहेर थांबलेल्या मोटारसायकलवर बसला, त्यानंतर दोघे इसम वेगाने बाळेश्वर नाक्याच्या दिशेने निघून गेले, 18 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप ( मंगळसूत्र) त्यास डोरले असलेले सोन्याची गोप जबरीने खेचून नेले.
दरम्यान काळ्या रंगाची मोटारसायकल चालविणारा इसम हा अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, अंगात पांढर्या रंगाचा फूल बाह्याचा शर्ट , निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला इसम अंगाने मध्यम, चेक्स टाईप फिक्कट लाल रंगाचा शर्ट घातलेला, रंगाने सावळा होता, याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार करत आहेत.


No comments:
Post a Comment