Breaking

Thursday, 2 June 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथील तलाठ्याला चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर -
मोडनिंब येथील तलाठ्याला चार हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले - याबाबत सविस्तर वृत्त असे की शेतातील महोगणी झाडांची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी चार हजार रूपयाची लाच घेताना मोडनिंब येथील तलाठी राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 

महेशकुमार मनोहर राऊत, तलाठी, सजा-मोडनिंब, ता.माढा,जि.सोलापूर, रा.मेडशिंगी, ता.सांगोला असे लाच घेणार्या तलाठ्याचे नाव आहे.

यामधील तक्रारदार यांची मौजे मोडनिंब येथे क्र.522 वर 58 आर बागायत शेतजमीन आहे. सदर शेतजमीन पैकी 40 आर शेतजमीनीवर महोगनी झाडाची लागवड केली असून, त्याबाबत साता बारा उताऱ्यावर पिकपाण्याची नोंद घेणेकामी मौजे मोडनिंब चे गावकामगार तलाठी महेशकुमार मनोहर राऊत यांनी 4000/- रूपये लाचेची मागणी करून तो स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे, यातील आरोपी याला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

No comments:

Post a Comment