Breaking

Friday, 18 March 2022

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगड च्या अविनाश देडगेची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड.


*पंढरपूर सिंहगडच्या अविनाश देडगेची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड*
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेल्या अविनाश देडगे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली.
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या निकालामध्ये पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी अविनाश देडगे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा तसेच जगातील नामांकित कंपनीत, शासकीय सेवेत सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाविद्यालयाकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. त्यासाठी आवश्यक ती मदत महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना करण्यात येत असते. यामुळे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
   अविनाश देडगे या विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. नामदेव सावंत, प्रा. अनिल निकम,  आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

 सिंहगड मध्ये नुतन पोलीस उपनिरीक्षक अविनाश देडगे यांचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. सर्जेराव महारनवर आदी.

No comments:

Post a Comment