Breaking

Wednesday, 2 February 2022

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगड मध्ये टुलस् अॅन्ड टेंनिक्स फाॅर रिसर्चर या विषयावर कार्यशाळा संपन्न.


*पंढरपूर सिंहगड मध्ये "ट्रलस्  अँण्ड टेंनिक्स् फाॅर रिसर्चचर" या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न*

पंढरपूर: कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिहंगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील "टुलस्  अँण्ड टेकनिक्स् फाॅर रिसर्चचर" या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा  आयोजित करण्यात आली होती हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
     या कार्यशाळेची प्रस्तावना करताना डाॅ. बाळासाहेब गंधारे म्हणाले "रिगरेशन अँनेलिसिस युसिंग एस. पी. एस. एस." कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी रिसर्च म्हणजे काय? रिसर्चची प्रोसेस कशी असते. डेटा अँनेलिसिस् का करायचे, कशासाठी करायचे, उपयोग, फायदे आणि त्याची मर्यादा ह्याबद्दल उदाहरण देऊन माहिती डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी दिली.
    प्रा. गणेश बिराजदार यांनी "मॅटलॅब फाॅर रिसर्च" या विषयावर व्याख्यान दिले. मॅटलॅब ह्या साॅफ्टवेअर बद्दल प्राथमिक माहिती देऊन त्याचा योग्य वापर व उपयोग कुठे कसा करायचा याची माहिती देण्यात आली.
   डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी " मिनीटॅब साॅफ्टवेअर फाॅर डाटा ॲनेलिसिस" या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. साॅफ्टवेअर कसे वापरायचे, त्यामध्ये डेटा ॲनेलिसिस् करता येतो. हे प्रात्यक्षिकाने दाखवले आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत मिनीटॅब वापरून केलेले संशोधन केस स्टडी म्हणून समजावून सांगितले. 
    डाॅ. संपत देशमुख यांनी "टुलस् ॲण्ड टेकनिक फाॅर रिसर्च पेपर रायटिंग" याविषयावर मार्गदर्शन केले. रिसर्च पेपर आराखडा कसा असतो, रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी सारांश, विषयाची सुरवात, मेथड आणि डेटा अनॅलिसिस, कनक्लूजन रेफरन्स कसे लिहावे हि महत्वपूर्ण माहिती डाॅ. संपत देशमुख यांनी दिली.
   हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय गिराम,  प्रा. नंदकिशोर फुले, प्रा. राहूल शिंदे आदींसह मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment