बिग बॉस 15 ची विजेती ठरली तेजस्वी प्रकाश- याबाबत वृत्त असे की छोट्या पडद्यावरील पण तितकाच वादग्रस्त राहणारा कार्यक्रम म्हणून बिग बॉस कडे पाहीलं जातं.यंदाच्या झालेल्या बिग बॉस मध्ये अनेक रंजक ट्विस्ट होते. बिग बॉस 15 चा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेवटच्या क्षणी तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सहजपाल यांच्यात काटे की टक्कर पहायला मिळाली.तेजस्वीला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे तेजस्वी प्रकाश या मोसमाची विजेती ठरली.
अंतिम पाच स्पर्धकांमध्ये शमिता शेट्टी,तेजस्वी प्रकाश,करण कुंद्रा,निशांत भट,प्रतिक सहजपाल यांचा समावेश होता. हे स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत वेगवेगळे डावपेच आखताना पाहायला मिळाले.
महाअंतिम सोहळ्याचा शेवटचा क्षण हा खूप भावस्पर्शी आणी भावनिक बघायला मिळाला.
महाअंतिम सोहळ्यात बिग बॉस 13 चा विजेता आणी दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्युट दिला गेला. बिग बॉस च्या घरातील स्पर्धकांनी कधी भांडण्याने,तर कधी रडण्याने,कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने बिग बॉस च्या घराला घरपण आणले होते. परंतु आता हा प्रवास संपला आहे.
कोण आहे तेजस्वी प्रकाश ?
तेजस्वी प्रकाशचे कुटूंब संगीत कलेच्या खूपच जवळचे आहे.मात्र तेजस्वी ही एक अभियंता आहे. पण अभिनयाच्या आवडीमुळे तिने अभियंत्याची नोकरी सोडून दिली. त्यानंतर तिने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आपल्या करिअरमध्ये मार्गक्रमण केले. तेजस्विने 2612 या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली. त्यानंतर ती संस्कार धरोहर अपनोंकी,स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का, अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये ती दिसून आली. त्यासोबतच तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटीशो देखील केले आहेत. खतरों के खिलाडी 10, किचन चॅम्पियन 5, काॅमिडी नाइट्स लाईव्ह, काॅमिडी नाइट्स विद कपिल,काॅमिडी नाइट्स बचाओ, यासारख्या शोमध्ये तेजस्वी प्रकाश दिसली आहे.


No comments:
Post a Comment