महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक काँग्रेस पक्षाच्या गांधी भवन कार्यालय मुंबई येथे पार पडली.यावेळी जिल्ह्यातील सखोल राजकीय परिस्थितीची तसेच युवक काँग्रेस च्या माध्यमातून जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती सर्व प्रदेश प्रतिनिधींसमोर मांडण्यात आली ,यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील काँग्रेस पक्षाची कामगिरी तसेच आगामी जिल्ह्यातील येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची तयारी माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्या समोर मांडण्यात आली . या बैठकीला राज्याच्या सहप्रभारी सोनम पटेल मॅडम, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान साहेब, आ. प्रणितीताई शिंदे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई साहेब,मोहन दादा जोशी, चारुलताताई टोकस यांच्यासह सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री डॉ. सुरेशराव जाधव तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment