Breaking

Saturday, 11 December 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - उपळवटे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार...रस्ते मंजूर असूनही कामे रखडली असल्याने लोंढे वस्ती उपळवटे येथील रस्त्याच्या दुरावस्थेत अधिकच भर.....भविष्यात आक्रमक भूमिका घेऊ ...अक्षय देवडकर.


उपळवटे ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार 
रस्ते मंजूर असून ही कामे रखडलेली असल्याने लोंढे वस्ती उपळवटे येथील रस्त्याच्या दुरवस्थेत अधिक च भर..
भविष्यात आक्रमक भूमिका घेऊ-अक्षय भैय्या देवडकर (मोरया ग्रुप उपळवटे)

गेल्या वर्षांपासून उपळवटे गावातील लोंढे वस्ती येथील रस्त्याची दुरवस्था वाढतच चालली आहे पावसाळ्यात येथील रस्त्यावरुन जीवाशी कसरत करून लहानथोर,मुलं, वृद्ध, व शाळेचे विद्यार्थी यांच्या समवेत येथील नागरिक देखील ये जा करत असतात.
सदर रस्त्याच्या नुतनीकरणसाठी शासनाकडून गत वर्षीच अंतिम मंजुरी देऊन निधी ची भरीव तरतूद केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कळत असून सदर रस्त्याचे अद्याप ही काम सुरू झाले नसून सर्व ग्रामस्थ किंबहुना लोंढे वस्तीचे सर्व नागरिक सदर विषयास त्रस्त झाले आहेत.
पुढे चालून वयोवृद्ध व लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तर सदर परिस्थिती ची गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा वयोवृद्धांच्या जीविताची जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल याची नोंद उपळवटे ग्रामपंचायत ने घ्यावी .असा इशारा मोरया ग्रुप चे अध्यक्ष अक्षय भैय्या देवडकर यांनी दिला.

No comments:

Post a Comment