Breaking

Monday, 31 January 2022

करमाळा तालुका प्रतिनिधी/ संदीप शिंदे - शासकीय कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात अंमलबजावणी करा....अतुल खुपसे-पाटील.


शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात अंमलबजावणी करा
अतुल खुपसे पाटील
 जनशक्ती संघटना प्रमुख 
माढा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी- शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना देखील कर्मचारी राहत नसल्याने, त्याची अंमलबजावणी करावी. अशी मागणी जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी माढा तहसील कार्यालयाकडे निवदेणाद्वारे केली आहे. 
                      माढा हा प्रचंड मोठा तालुका असून, शेवटचे गाव जवळपास सत्तर किलोमीटरच्या आसपास आहे. तिथून नागरिक शासकीय कार्यालयात आल्यास अधिकारी भेटत नसल्याने, विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकाऱ्यांना गावाकडून येण्यासाठी विलंब होत असल्याने, नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. येणे-जाण्यात जास्त वेळ जात असल्याने, अधिकाऱ्यांचे कामात लक्ष लागत नाही. माढा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार, पुरवठा विभाग, कुळ कायदा, निवडणूक शाखा, अस्थापणा यांच्यासह पंचायत समिती, पोलीस ठाणे, दुय्यम निबंधक, कृषी कार्यालय, भुमी अभिलेख, आरोग्य विभाग तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात अंमलबजावणी करावी. असे अतुल खुपसे-पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
तहसीलदार
राजेश चव्हाण
माढा 

No comments:

Post a Comment