Breaking

Sunday, 30 January 2022

संपादक/ विजयकुमार परबत- 11 फेब्रुवारी 2022 रोजी पृथ्वीचा विनाश होणार? अमेरिकेच्या नासा संस्थेने दिला इशारा, जाणून घेऊया काय आहे प्रकरण.


11 फेब्रुवारी 2022 रोजी पृथ्वीचा विनाश होणार ? अमेरिकेच्या नासा संस्थेने दिला इशारा, जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण- याबाबत वृत्त असे की अमेरिकेन संस्था नासाने एक धोक्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नासाने असे म्हटले आहे की, 11 फेब्रुवारी 2022 रोजी एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल आणी जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठा विनाश घडू शकतो.

आपल्या पृथ्वीला दररोज अवकाशातून पडणार्या अनेक लघुग्रहांना सामोरे जावे लागते, यातील अनेक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जातात,तर अनेक लघुग्रह समुद्रात पडतात.परंतू जर एखादा महाकाय लघुग्रह समुद्राऐवजी जमीनीवर पडला तर मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. अशी एका धोक्याची सूचना नासाने दिली आहे. 
नासाने म्हंटले आहे की 11 फेब्रुवारी रोजी पृथ्वीच्या जवळून एक विशाल लघुग्रह जाणार आहे. हा लघुग्रह आणी पृथ्वी यांच्यात टक्कर झाल्यास  पृथ्वीचा विनाश होण्याची शक्यता आहे. 

लघुग्रहाचा आकार किती आहे? 
पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणार्या या लघुग्रहाचा आकार एम्पायर स्टेट बिल्डिंग पेक्षाही मोठा असल्याचे नासाने म्हंटले आहे. त्याला 138971 ( 2001 CB21) असे नाव देण्यात आले आहे. या लघुग्रहाची रूंदी 4265 फूट असून नासाने पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार्या लघुग्रहांच्या यादीत याला स्थान दिले आहे. मात्र पृथ्वीच्या सर्वात जवळून गेल्यानंतरही  तो पृथ्वीपासून तीन लाख मैलांवरून जाईल.

No comments:

Post a Comment