कुर्डूवाडी, परांडा रोड येथे HIV/AIDS बाधित महिला आणि बालकांसाठी 'उम्मीद' हे आधार व उपचार केंद्र कार्यरत असून जन्मतःच HIV/ AIDS या जीवघेण्या आजाराने पीडित बालकांचे संपूर्ण निरोगी आणि संस्कारक्षम संगोपण हे ध्येय ठेवून गेली 13 वर्ष 'उम्मीद' चे कार्य अविरतपणे सुरू आहे. 'उम्मीद' मधील बालकांचा सर्वच पातळींवर म्हणजेच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य असा संघर्ष सातत्याने सुरूच आहे. हा संघर्ष सुरू असताना या बालकांचा मनात कोठे उपेक्षा आणि निराशा नकारात्मकता निर्माण होऊ नये म्हणून 'उम्मीद' चे आटोकाट प्रयत्न सुरू आहे. 'उम्मीद' च्या प्रयत्नांना अनेक सामाजिक संस्था म्हणून महनीय व्यक्तींकडून मोठा सहयोग प्राप्त होत आहे. तरीही 'उम्मीद' च्या अडचणी आजही आव्हानात्मक ठरत आहेत म्हणून 'उम्मीद' संस्थेच्या सचिवा डॉ. ब्रह्माकुमारी प्रमिलाबेन(दिदी) यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे "हिंमत निधी योजना" बालकांच्या मदतीसाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून ही संकल्पना सुरू केली आहे. दिदीचे खरेच कौतुकास्पद कार्य आहे.असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सुधीर भाऊ गाडेकर प्रदेश युवक अध्यक्ष नाभिक संघटना यांनी या वेळी बोलताना सांगीतले.
या कार्यक्रमाची सुरुवात ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून झाली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी चे ह.भ.प मा.श्री दशरथ( बुवा) देशमुख,
मा. श्री कुंदनजी सुराणा व सौ. (भाभी) सुराणा यांनी दान कसे करावे याबद्दल महंत ऋषी यांची आठवण करून दिली. प्रमुख उपस्थितीत माढा श्री दत्त मंदिराचे मा.श्री. सुरेश (महाराज) चव्हाण, तसेच मा.श्री.आबासाहेब हिवाळे ( पिपल्स RPI सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष) यांनी 'उम्मीद' च्या बालकांसाठी मदतीचे हात देऊ असे आश्वासन दिले.
या वेळी परिवहन कर्मचारी (मोटार वाहन विभाग सोलापूर आरटीओ) साहेब मा श्री रणदिवे साहेब यांनी दि.४/१२/२०२१ रोजी 'उम्मीद' मध्ये येऊन समक्ष मुलांना भेट देऊन 'उम्मीद' हे एक मानवतेची घर आहे. असा संदेश त्यांनी दिला व आपल्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या . तसेच एका महिन्याचा किराणा व धान्य धान्यही दिले आहे .काही कारणास्तव ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच पॅशन स्पोर्ट अॅण्ड मेंनस ॲक्सेसरीज टेंभुर्णी चे मा. श्री. प्रमोदजी शिंदे (सर)दि.२६/११/२०२१ रोजी मुलांना क्रीडा साहित्य देऊन त्यांनी ही या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाची सांगता ही जागतिक एड्स सप्ताह दिन व समुपदेशन पर बालकांच्या पथ नाट्यानी झाली.
या कार्यक्रमास परिश्रम घेतलेले 'उम्मीद' मधील बालके व कर्मचारी स्टाफ(१) श्री गोविंद सुतार (काळजीवाहक)(२) श्री शुभम कुमार जैन (चालक)(३) सौ नागरबाई बनसोडे(स्वयंपाकी)
इत्यादींनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment