Breaking

Tuesday, 7 December 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- माढा तालुका प्राथमीक शिक्षण सल्लागार समितीवर राजन सावंत सर.


माढा तालुका प्राथमिक शिक्षण सल्लागार समितीवर राजन सावंत सर यांची नियुक्ती- याबाबत वृत्त असे की मौजे मोडनिंब येथील राहीवासी व सध्या तुळशी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले तुळशी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजन सावंत सर यांची  जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना .श्री दत्तामामा भरणे (राज्यमंत्री -सार्वजनिक बांधकाम व इतर उपक्रम )यांचे पत्रानुसार करण्यात आली आहे यावेळी बोलताना सावंत सर म्हणाले की खरं पाहता  --हे सगळे अनाहुत  आहे .शिक्षण क्षेत्रात काम करत असताना -शिक्षण, शिक्षक आणि बालके (विद्यार्थी )यांचे अनेक प्रश्न आजही मनात आहेत. या निमित्तानं या सर्व प्रश्नांना स्पर्श करण्याची व्यक्त होण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली आहे. या तालुक्याचे भाग्यविधाते आमचे दैवत आदरणीय- दादा, जिल्ह्याचे नेते आदरणीय- मामासाहेब , जि.प. सदस्य- आदरणीय भारत आबा,यांचे मार्गदर्शनानुसार या तालुक्यांतील शिक्षण/विद्यार्थ्यांच्या  गुणवत्तेला  अग्रक्रमांकावर ठेवण्यासाठी आपण सर्व बंधू भगिनी या उपक्रमाला -(तालुका सल्लागार समितीला ) सहकार्याचा धागा बनून राहू..हीच या शैक्षणिक कार्यासाठी आपण सर्वजणच सोबत राहू... धन्यवाद!!  . आपण दिलेल्या शुभेच्छांचे अंत: करण पूर्वक स्वागत -राजन सावंत सर

No comments:

Post a Comment