परितेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील जि.प.शाळा व वस्ती शाळा यांना प्रत्येकी आर.ओ.पाणी फिल्टर संच,पाण्याची टाकी,संपूर्ण गॅस कनेक्शन संच,क्रिकेट संच,कॅरम बोर्ड,बॅडमिंटन संच,बुद्धिबळ संच,लगोरी संच आदी क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच परितेवाडी गावातील अंगणवाडी सह चव्हाण वस्ती व चव्हाणवाडी अंगणवाडीतील प्रत्येक विद्यार्थ्यास प्रत्येकी दोन गणवेश आणि एक दप्तर वितरित करण्यात आले. तसेच गावातील गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.माध्यमिक शिक्षणासाठी गावाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य भारत आबा शिंदे हे होते तर पं.स.सदस्य धनराज दादा शिंदे,राजकुमार भाऊ पवार,ग्रा.पं.सदस्य धनंजय शिंदे,सरपंच प्रतिनिधी सचिन चव्हाण,उपसरपंच तानाजी चव्हाण,ग्रामसेविका माने मॅडम,ग्रा.पं.सदस्य हनुमंत पवार,ग्रा.पं.सदस्य पितांबर चट्टे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना परितेवाडी गावातील पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन जि.प.सदस्य भारत आबा शिंदे यांनी दिले तर गावातील तरुणांसाठी येत्या दोन महिन्यात जिमचे साहित्य देऊ असे प्रतिपादन पं.स.सदस्य धनराज दादा शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन शंकर नागरी यांनी केले आणि आभार प्रदर्शन आप्पासाहेब शिंदे यांनी केले.यावेळी हिम्मत पवार,हरिदास शिंदे,सुनीलबाप्पा वाघ,रेवन पवार,गणेश शिंदे,किसन गायकवाड पाटील यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक तसेच महिला नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन शिंदे,श्रीराम नागणे,बळीराम शिंदे,सुरज सय्यद यांनी प्रयत्न केले.
Sunday, 5 December 2021
Home
/
महाराष्ट्र
/
सोलापूर
/
विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - ग्रामपंचायत परितेवाडीच्या वतीने गरजूंना साहित्याचे वाटप.
विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - ग्रामपंचायत परितेवाडीच्या वतीने गरजूंना साहित्याचे वाटप.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment