Breaking

Sunday, 5 December 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी /अमिर आतार - पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर यांचे आदेश...6 डिसेंबर अभिवादनाला हे असतील निर्बंध.


*पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांचे आदेश ; 6 डिसेंबर अभिवादनाला हे असतील निर्बन्ध*

*सोलापूर :* डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन दि.०६ / १२ / २०२१ रोजी आहे. सध्या कोराना २०१९ चा संसर्ग चालू असल्याने महाराष्ट्र शासन यांनी जा.क्र. संकीर्ण- ११२१/प्र.क्र.२३२/विशा-१अ दि. ३०/११/२०२१ अन्वये निर्गमित केलेल्या सुचनांचे/ आदेशाचे तंतोतंत पालन करुन सदर महापरीनिर्वाण दिन साधेपणाने करण्याचे सुचना दिल्या आहेत. त्याबाबत नागरीकांना अवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाकडील मार्गदर्शक सूचना व पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे खालील प्रमाणे अनुकरण करावे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (पार्क चौक), अस्थी विहार (बुधवारपेठ), डॉ.बाबासाहेब आंबेडकर उदयान (सम्राटचौक) या ठिकाणी मानवंदना करीता एकत्र न जमता आपले राहते घरुनच मानवंदना दयावी.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास सामाजीक संघटनेचे कार्यकर्ते यांना प्रातिनिधिक स्वरुपात मानवंदना करण्याकरीता संबंधित पो.स्टे. कडून पास देवुन आत सोडण्यात येईल. पासेस करीता संस्था / संघटनेच्या पदाधिका-यांनी प्रातनिधीक स्वरुपात पोलीस स्टेशन येथे विनंती अर्ज (फोटो व नावासह) सादर केल्यांनतरच संस्था / संघटनेतील ४ व्यक्तींना मानवंदना करण्याकरीता परवानगी देण्यात येईल. तसेच पास मागणी करणाऱ्या इसमांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असने बंधनकारक आहे.

कोवीड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहिल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना तसेच आणखी काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे.

No comments:

Post a Comment