Breaking

Sunday, 5 December 2021

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन साजरा करत असताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.


सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन दि.०६ / १२ / २०२१ रोजी आहे. सध्या कोराना २०१९ चा संसर्ग चालू असल्याने महाराष्ट्र शासन यांनी जा.क्र. संकीर्ण- ११२१/प्र.क्र.२३२/विशा-१अ दि. ३०/११/२०२१ अन्वये निर्गमित केलेल्या सुचनांचे/ आदेशाचे तंतोतंत पालन करुन सदर महापरीनिर्वाण दिन साधेपणाने करण्याचे सुचना दिल्या आहेत. त्याबाबत नागरीकांना अवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाकडील मार्गदर्शक सूचना व पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे खालील प्रमाणे अनुकरण करावे.


> डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (पार्क चौक), अस्थी विहार (बुधवारपेठ), डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान (सम्राटचौक) या ठिकाणी मानवंदना करीता एकत्र न जमता आपले राहते घरुनच मानवंदना दयावी.



> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास सामाजीक संघटनेचे कार्यकर्ते यांना प्रातिनिधिक स्वरुपात मानवंदना करण्याकरीता संबंधित पो.स्टे. कडून पास देवुन आत सोडण्यात येईल. पासेस करीता संस्था / संघटनेच्या पदाधिका-यांनी प्रातनिधीक स्वरुपात पोलीस स्टेशन येथे विनंती अर्ज (फोटो व नावासह) सादर केल्यांनतरच संस्था / संघटनेतील ४ व्यक्तींना मानवंदना करण्याकरीता परवानगी देण्यात येईल. तसेच पास मागणी करणाऱ्या इसमांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असने बंधनकारक आहे.



> कोवीड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहिल.



> डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना तसेच आणखी काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे.ह

No comments:

Post a Comment