Breaking

Friday, 13 August 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार - शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीवर उभा असलेला बहुजन सत्यशोधक संघ महिला संघ आघाडीच्या शाखेचे सुस्ते येथे उद्घाटन संपन्न...आघीडीची ताकद वाढविण्यास सुरूवात.



*शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीवर उभा असलेला बहुजन सत्यशोधक संघ महिला आघाडीच्या सुस्ते शाखेचे उद्घाटन संपन्न महिला,आघाडी ची ताकद वाढवण्यास सुरुवात*
सुस्ते तालुका पंढरपूर येथे बहुजन सत्यशोधक महिला संघ शाखा उद्घाटन, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान द्वारे महिलांना हक्क अधिकार दिले आहेत ते हक्क व अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नसतील तर आपण रस्त्यावरचा संघर्ष केला पाहिजे, यासाठी संघटित होऊन संघर्ष करा, संघटन तुमच्या पाठीशी राहील एससी, एसटी वर होणारे अन्याय अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, ओबीसीची जातिनिहाय जनगणना करावी असे ते म्हणाले, यावेळी बहुजन सत्यशोधक महिला संघ प. महा. उपाध्यक्ष ज्योतीताई भुजंगे, नूतन पंढरपूर तालुका संघटक सोनाताई कांबळे,गायत्रीताई  रणदिवे शाखा अध्यक्ष,प.महा सदस्य अनिल  सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे,
युवक नेते महादेव गाडे,पंढरपूर ता. युवक उपाध्यक्ष आदर्श लोंढे, युवक नेते सुरेश वाघमारे, सतीश वाघमारे, लखन वाघमारे, आप्पासाहेब ओहोळ,सुनील लोंढे, लखन वाघमारे,लक्ष्‍मण वाघमारे,
अविदा रणदिवे,चंद्र रणदिवे, सुषमा पाटोळे, मंगल खवळे, सोनाली कांबळे,असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment