प्रतिनिधी
सुस्ते तालुका पंढरपूर येथे बहुजन सत्यशोधक महिला संघ शाखा उद्घाटन, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान द्वारे महिलांना हक्क अधिकार दिले आहेत ते हक्क व अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नसतील तर आपण रस्त्यावरचा संघर्ष केला पाहिजे, यासाठी संघटित होऊन संघर्ष करा, संघटन तुमच्या पाठीशी राहील एससी, एसटी वर होणारे अन्याय अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, ओबीसीची जातिनिहाय जनगणना करावी असे ते म्हणाले, यावेळी बहुजन सत्यशोधक महिला संघ प. महा. उपाध्यक्ष ज्योतीताई भुजंगे, नूतन पंढरपूर तालुका संघटक सोनाताई कांबळे,गायत्रीताई रणदिवे शाखा अध्यक्ष,प.महा सदस्य अनिल सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे,
युवक नेते महादेव गाडे,पंढरपूर ता. युवक उपाध्यक्ष आदर्श लोंढे, युवक नेते सुरेश वाघमारे, सतीश वाघमारे, लखन वाघमारे, आप्पासाहेब ओहोळ,सुनील लोंढे, लखन वाघमारे,लक्ष्मण वाघमारे,
अविदा रणदिवे,चंद्र रणदिवे, सुषमा पाटोळे, मंगल खवळे, सोनाली कांबळे,असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment