Breaking

Friday, 27 May 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- जिल्ह्यात शेततळ्यात घडत असलेल्या अपघाती घटनांबाबत सूचना जारी करण्यात याव्यात....बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन.


जिल्ह्यात शेततळ्यात घडत असलेल्या अपघाती घटनांबाबत सूचना जारी करण्यात याव्यात....बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन -  याबाबत वृत्त असे की सोलापूर
 जिल्ह्यात शेततळ्यात घडत असलेल्या अपघाती घटनांबाबत सूचना जारी करणेबाबत बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,  नुकतेच शेटफळ ता. मोहोळ येथे शेततळ्यात पडून तीन निरागस बालकांचा अत्यंत दुर्दैवी व पीडादायक मृत्यू झाला. याअगोदरही जिल्हाभरात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. भर उन्हाळ्यात तहानलेले वन्यजीव व पाळीव प्राणी शेततळ्यात मरणे हे नित्याचेच झाले आहे.
        तरी या निवेदनातील खालील मागण्या   
१) शेततळ्यासाठी शासकीय अनुदान प्राप्त शेतकऱ्यांना शेततळ्यावर तारेचे भक्कम कुंपण घालण्यासाठी सूचना देण्यात याव्यात.
२) नवीन शेततळी होत असतील तर आत  पेपर टाकलेबरोबर वरच्या बाजूस तारेचे फेन्सिंग करण्यासाठी सूचना द्याव्यात अन्यथा अशा शेतकऱ्यांचे अनुदान रोखण्यात यावे.
    ३) कृषी मंडल अधिकाऱ्यांनी असे सर्व्हेची यादी तालुका कृषी कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून द्यावी.
  ४)   याउपर जर भविष्यात अशा जिवितहानीच्या घटना घडत असतील तर यासाठी कोण जबाबदार आहे हे स्पष्ट करावे.
           या मुद्द्यांची तात्काळ व गंभीरपणे दखल घेऊन यासंबंधी संबंधितांना सूचना जारी कराव्यात अशी मागणी... बहुजन सत्यशोधक संघ राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी केली, यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटोळे, श्रीकांत जवंजाळ,कपिल सिताफळ, गणेश मस्के हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment