Breaking

Tuesday, 18 May 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - कराड तालुक्यातील तांबवे फाटा येथूनच जवळच तांबवे नदी पात्रात सापडले ग्रॅनाईट बाॅम्ब.


कराड --  तालुक्यातील   तांबवे फाटा  येथून  जवळच तांबवे नदीच्या पात्रात ग्रॅनाईट (बॉम्ब ) सापडले.  कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेतली त्यांनी  वरिष्ठ यांना महिती  दिली . पंचनाम्याने काम चालू होते . याला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे . सोमवार दि /17  रोजी  सकाळी 11   






वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली .
  तांबवे  नदीपात्रामध्ये सोमवार सकाळी काही युवक मासेमारी करण्यासाठी गेले होते . मासे पकडण्यासाठी त्या युवकांनी  नदीच्या पाण्यामध्ये गळ ( जाळी )  टाकल्यानंतर   त्यांच्या गळाला मासा लागल्याचा अंदाज  आल्याने त्यांनी  गळ  पाण्याबाहेर काढला . त्यावेळी त्यामध्ये ग्रॅनाईट (बॉम्ब) असल्याचं निदर्शनास आले . ते अतिशय अवजड असल्याने त्यांना  त्या बाबत शंका आली . मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत  त्वरित पोलिसांशी  संपर्क साधला .  पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून  पंचनामा करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत चालू। होते.







  दरम्यान सापडलेले  ग्रॅनाईट हे सैन्य दलातील असावेत असा अंदाज व्यक्त करत आहेत .याबाबत  माहिती घेण्याचे काम सुरू आहे घटनास्थळी दशहतवाद विरोधी पथकाने भेट दिली असून माहिती घेण्याचे काम सुरू आहे

No comments:

Post a Comment