Breaking

Monday, 28 September 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. सुनिलजी ओहोळ यांच्या हस्ते संघटनेच्या लोगोचे प्रकाशन.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. सुनिलजी ओहोळ यांच्या हस्ते संघटनेच्या लोगोचे प्रकाशन- याबाबत सविस्तर वृत्त असे की बहुजन सत्यशोधक संघ ही एक सामाजिक संघटना आहे व ही संघटना अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आतापर्यंत या संघटनेने अनेकांना न्याय मिळवून दिला आहे . टेंभूर्णी येथे बहुजन सत्यशोधक संघ या सामाजिक संघटनेच्या लोगोचे प्रकाशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुनिलजी ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आले, बहुजन सत्यशोधक संघ हे संघटन Sc,St,Obc मायनाॅरिटी या प्रवर्गातील भूमीहीन, असंघटीत बेरोजगार विद्यार्थी यांच्या सामाजिक शैक्षणिक उन्नतीसाठी काम करत असून खाजगीकरण, उदारिकरण, भूमंडलीकरण, याला संघटनेचा तीव्र विरोध असून भारतीय संविधानाची 100% अंमलबजावणी करण्यात यावी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे विचार घरा- घरामध्ये पोहचवणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे अशी माहीती बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. सुनिलजी ओहोळ यांनी VBP न्यूज सोबत बोलताना दिली व यावेळी अॅड. धनंजय बाबर, जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितिन वाघमारे, तालुका अध्यक्ष समाधान भोसले, बापू लोंढे, सतिश वाघमारे, महेंद्र शिंदे, क्रांतीदिप  लोंढे ( टेंभूर्णी शहराध्यक्ष) बापू माने, लखन वाघमारे, दयावान ओहोळ, विजय गाजरे, अनिल सरवदे, अमित ओहोळ, व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment