वैराग शहर प्रतिनिधी/ योगेश भालशंकर - वैराग नगरपंचायतीची घोषणा; अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली- या बाबत सविस्तर वृत्त असे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात वैराग ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेचे पत्र वैरागचे राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांना देण्यात आले आहे. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आ.संजय मामा शिंदे,
आ.यशवंत माने, आ.दिपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, बालाजी पवार आदी उपस्थित होते. या घोषणेमुळे वैराग करांची अनेक दिवसांपासूनची नगरपंचायतीची मागणी पूर्ण झाली आहे. या घोषणेची बातमी समजताच वैराग करांनी फटाक्यांची आतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
याबाबत वैराग नगरपंचायतीची 24 डिसेंबर 2020 रोजी उदघोषणा करण्यात आली होती. यावर हरकती घेऊन मंगळवारी याबाबत नगरविकास विभाग मंत्रालय यांच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
सध्या वैराग ग्रामपंचायतचे मुदत संपल्याने ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती. परंतु सध्या ग्रामस्थांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने वैराग ग्रामपंचायतची निवडणूक रद्द झाली होती. तसेच नगरपंचायतीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते भुमकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर कोर्टाने राज्य शासनास लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते त्यामुळे वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायत रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला होता सध्या ग्रामपंचायतीवर मुदत संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे या घोषणेनंतर वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले आहे, नवीन पुनर्रचित नगरपंचायतीची निवडणूक होईपर्यंत,
बार्शी तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश नगर विकास विभाग मंत्रालयाने दिले आहेत, येणाऱ्या काळात बार्शी तालुक्याच्या राजकारणात वैराग प्रति सत्ताकेंद्र निर्माण होणार असल्याने सध्या अनेकांचे लक्ष आता वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे लागले आहे.


No comments:
Post a Comment