Breaking

Friday, 21 May 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - मानेगाव येथे आशामंत फाऊंडेशनच्या वतीने मोफत किराणा सामानाचे वाटप.


माढा तालुका प्रतिनिधी/मदन मुंगळे- सध्या कोरोना महामारीने संपूर्ण जगाला त्रस्त केलेले असताना, सर्व ठिकाणी लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आणी त्याच बरोबर ज्यांची हातावरची पोटं आहेत जे निराधार आहेत. 







अशा लोकांवरती सध्या खूप वाईट वेळ आली आहे, त्यांना हाताला काम नाही, त्यामुळे त्यांचे खायचे वांदे निर्माण झाले आहे, अशातच अनेक संघटना, सामाजिक संस्था त्यांच्या मदतीला धावून येत आहेत, मानेगाव येथे आशामंत फाऊंडेशन च्या वतीने जे निराधार आहेत, विधवा, अपंग, दिव्यांग अशांना मदतीचा हात देण्यात आला आहे. 







कोरोना महामारी मुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत आशामंत फाऊंडेशनने अपंग व निराधार विधवा महिला यांना 800रु किंमतीचे किराणा  किट मानेगाव येथे तालुका विस्तार अधिकारी सुतार साहेब सरपंच तानाजी लांडगे,








आशामंत फाऊंडेशन च्या वतीने निराधारांना मदतीचा हात 
 ग्रा पं सदस्य शितलकुमार जोकार बाबा पारडे सदस्य प्रतिनिधी सुशिल पारडे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी फाऊंडेशनचे हनुमंत बरबोले सर विजय शिंदे वामन बावळे सर व सर्व लाभार्थी उपस्थित होते कोरोनाचे सर्व नियम पळून हा कार्यक्रम करण्यात आला.








या त्यांच्या आशामंत फाऊंडेशन च्या कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, समाजातील प्रत्येक संस्थेने, सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे जर आपआपल्या गावात अशा लोकांची जबाबदारी उचलली तर नक्कीच ते उपाशी पोटी राहणार नाहित तर मग आजपासून आपण निश्चय करूया अशा लोकांना मदतीचा हात देऊया.

No comments:

Post a Comment