Breaking

Thursday, 20 May 2021

मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 20/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती.


मोहोळ शहर प्रतिनिधी /सुनिल गायकवाड - सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. प्रशासन वारंवार सूचना करत आहे. तरीपण लोक काहीना काही कारणास्तव बाहेर पडत असताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात सोलापूर शहरातील कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. 








ग्रामीण भागात मात्र दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे, लसीकरणासाठी लोकांना प्रवृत्त केले जात आहे. सोलापूर जिल्हा परिषद कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जीवाचं रान करत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी गावोगावी कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत.








तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव हे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत, वारंवार ते जिल्हाभर सूचना देत आहेत. डाॅ.शितलकुमार जाधव यांनी जिल्हाभर प्राथमिक आरोग्य केंद्रांना भरपूर प्रमाणात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. 








डाॅ.शितलकुमार जाधव हे जिल्ह्यातील प्रत्येक दिवसाच्या कोरोना अपडेट्स वरती लक्ष देऊन आहेत. सोलापूर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा वारंवार लोकांना सांगत आहे की मास्क व सॅनिटायझर चा वापर करा, सोशल डिस्टंस ठेवून वागा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, परंतु लोक तसे करताना दिसत नाहीत. लोकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. व आपल्या जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मदत करावी. 








आज दि.20/5/2021 चा सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, आज प्राप्त झालेले अहवाल, पाॅझीटीह्व रूग्णांची माहिती, मयत झालेल्या व्यक्तींची माहिती, कोविड-19 तालुका निहाय माहिती, कोविड-19 तालुका निहाय गोषवारा अशी एकूण आजच्या दिवसभरातील माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे ती पुढील प्रमाणे...........





No comments:

Post a Comment