मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 21/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती- सोलापूर जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे आणी अशातच सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शहर वगळून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे,
यावर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव हे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत, नागरिकांनीही त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील 11 तालुक्यातील कोरोना परिस्थितीच्या आढाव्यावर सध्या जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांचे बारीक लक्ष असून ते कोरोना आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या आरोग्य यंत्रणेच्या विभागाला वारंवार सूचना करत आहेत, त्याचबरोबर सोलापूर शहरातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास प्रशासनाला बर्यापैकी यश आल्याचे दिसून येते.
तसेच कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, सोशल डिस्टंस ठेवून वागावे, मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे अश्या प्रकारे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
आज दि.21/5/2021 रोजीचा सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 चा अहवाल सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केला आहे.
यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, आज रोजी प्राप्त झालेले अहवाल, सोलापूर जिल्ह्यातील पाॅझीटीह्व रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील मयत रूग्णांची माहिती, तसेच सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय माहिती,


No comments:
Post a Comment