यंत्रमाग कामगारांकरीता मोफत अँटीजेन टेस्ट
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सोलापूरातील यंत्रमाग कामगारांकरीता रविवार, दि. 18 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत सोलापूरातील यंत्रमाग कामगारांकरीता सोलापूर यंत्रमाग धारक संघ, अक्कलकोट रोड, एम.आय.डी.सी., सोलापूर येथे मोफत अँटीजेन टेस्ट शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व यंत्रमाग कारखानदारांनी आपल्या कारखान्यातील सर्व कामगारांना याची सुचना देवून जास्तीत जास्त कामगारांची कोव्हिड-19 अँटीजेन टेस्ट करून घेण्यात यावी. जेणेकरून आपल्याला कामगारांना यंत्रमाग कारखान्यामध्ये काम करण्यास अडचण येणार नाही असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment