सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मातंग समाज महाविकास आघाडी सरकारवरती नाराज...वाघमारे- याबाबत सविस्तर वृत्त असे की अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यात दोन नंबर वरती असणार्या मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व न दिल्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षावर मातंग समाज नाराज झाला असून याची किंमत येणार्या पदवीधर निवडणुकीत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना मोजावी लागेल असा इशारा मातंग समाजाचे रामभाऊ वाघमारे यांनी दिला आहे.
टेंभूर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, अखिल महाराष्ट्र मातंग समाज मंडळाच्या वतीने सहा महिन्यांपासून मातंग समाजातील विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करत आहेत, याच मागणी पैकी एक मागणी म्हणजे विधान परिषद अस्तित्वात आल्यापासून गेल्या साठ वर्षात मातंग समाजाला एकाही राजकीय पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली नाही,मातंग समाजामध्ये सुद्धा कला, साहित्य, सहकार क्षेत्रातील शिक्षक, डाॅक्टर, वकील, इंजिनिअर, समाजसेवक मोठ्या प्रमाणावर असून हा समाज पहिल्या पासूनच काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला असून गेले सहा महिन्यांपासून मातंग समाजालातील प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडी चे प्रमुख नेते खा.शरद पवार साहेब , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चह्वाण, ना.धनंजय मुंडे, खा.सुप्रियाताई सुळे, खा.संजय राऊत, या सर्व प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मातंग समाजातील कुठल्याही एका व्यक्तीला राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर सदस्य म्हणून संधी देण्यात यावी अशी मागणी केली होती.
या पत्रकार परिषदेस क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे सुरेश पाटोळे, पंढरपूरचे नगरसेवक कृष्णा वाघमारे, सुनिल जगताप, रोहीत कांबळे, महादेव भोसले, रोहीत खिलारे, अनिल गवळी, बाळासाहेब बागाव, मोडनिंब ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव व मातंग समाजातील समाज बांधव उपस्थित होते.


No comments:
Post a Comment