*लग्नसोहळे नियम पाळूणच साजरे*
*करा नाहीतर अडचणीत याल*
कोरोनाने आपले अक्राळ-विक्राळ रूप धारण करायला सुरुवात केली आहे. रुग्णांबरोबर मृत्यूंची संख्याही कमालीची वाढलीय. अश्याही परिस्थितीमध्ये *लग्नसोहळे थाटामाटात करण्याचा अट्टाहास काही महाभागांचा आहे. त्यामुळेच शासनाने लग्न सोहळ्यांवर कडक निर्बंध लावून नियम न पाळणार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच ठिकाणी पोलीस पाटलांचे निलंबन झाले आहे तर कुटुंबप्रमुखासह मंडपवाले , बॅंडवाले यांच्यावरील गुन्हे दाखल झाले आहेत.* म्हणूनच अतिशहाणपण न करता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच लग्नसोहळे आयोजित करावेत.
*खरं तर कमीत कमी खर्चात लग्न करण्याची ही चांगली संधी आहे .
तिचा फायदा घ्यावा. कर्ज काढून फुकटचा डामडौल दाखवण्यात काही अर्थ नाही.* काहींनी लग्न थाटातच करायचे असे ठरवून लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत. मात्र लाॅकडाऊन कधी संपेल कुणीही सांगू शकत नाही. म्हणूनच आहे त्या परिस्थितीमधे लग्नसमारंभ उरका. *खर्च कमी होईल आणि तोच पैसा संसारासाठी वापरत येईल. कारण येणारा काळ हा खूपच कठीण आहे. म्हणूनच ऐका - विचार करा निर्णय घ्या.*


No comments:
Post a Comment