सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - रेमडेसिविर इंजेक्शन हे उपचार सुरू असलेल्या हाॅस्पीटलमध्येच उपलब्ध करण्यात यावेत शिवाजीराजे कांबळे यांची मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदनद्वारे मागणी- याबाबत वृत्त असे की रेमडेसिविर इंजेक्शन हे उपचार सुरू असलेल्या हाॅस्पीटलमध्येच उपलब्ध करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे केली आहे, सध्या माढा तालुक्यातील कोरोना बाधित रूग्ण संख्या वाढत आहे व त्यामुळे बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी हाॅस्पीटल वेळेत मिळत नाहीत, व त्यांना पंढरपूर, सोलापूर, बार्शी, इंदापूर, पुणे आदी ठिकाणी उपचारासाठी जावे लागते, परंतु सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेने ते कोणत्याही रूग्णालयात उपलब्ध नाही, व बाहेरील बाजारात मूळ किंमतीपेक्षा वीस पट जादा किंमतीने ते इंजेक्शन विकले जाते, त्यामुळे रुग्णांना सदरचे इंजेक्शन काळ्याबाजारातून विकत घेणे शक्य होत नाही रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णांची व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे व त्यामुळे रुग्ण हे मृत्यू पावत आहेत, रुग्णालयातच इंजेक्शन मिळत नसेल तर काय उपयोग अशा नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहेत रेमडेसिविर इंजेक्शन ची निर्मिती विक्री ही अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे, त्याचप्रमाणे कोरोना बाधित रूग्णांवर ज्या ज्या रूग्णालयात उपचार केले जातात फक्त त्याच रूग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले पाहिजे व त्यावर अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण ठेवायला हवे व आवश्यक तेवढेच रेमडेसिविर इंजेक्शन चा पुरवठा रूग्णालयांना करायला हवा व त्या इंजेक्शन ची ठरवून दिलेली जी किंमत आहे तेवढेच पैसे रूग्णाच्या देयकामधून घेतले पाहीजेत व त्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची होणारी पिळवणूक आहे ती थांबेल व रुग्ण वाचतील व जर का हे इंजेक्शन बाहेरील बाजारात उपलब्ध झाल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होईल याचा फटका रुग्णांना बसेल त्यामुळे ज्या ज्या रुग्णालयात कोरुना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत फक्त त्याच रूग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावे त्यामुळे होणारा काळाबाजार थांबेल व रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळेल त्यामुळे रुग्ण वाचतील व त्यांची पिळवणूक थांबेल, या सर्व प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी अशा प्रकारचे निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण चे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिले आहे.
Monday, 19 April 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - रेमडेसिविर इंजेक्शन हे उपचार सुरू असलेल्या हाॅस्पीटलमध्येच उपलब्ध करण्यात यावेत...शिवाजीराजे कांबळे यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - रेमडेसिविर इंजेक्शन हे उपचार सुरू असलेल्या हाॅस्पीटलमध्येच उपलब्ध करण्यात यावेत...शिवाजीराजे कांबळे यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment