Breaking

Friday, 2 April 2021

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे- पवना मुळा व इंद्रायणी नदीवरील जलपर्णी काढण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाकडून दोन कोटी तीस लाख खर्च.


#पवना_मुळा_व_इद्रायणी_नदीवरील_जलपर्णी_काढण्यासाठी_पिंपरी_चिंचवड_मनपाकडून_दोन_कोटी_तीस_लाख_खर्च••••••

दरवर्षी या जलपर्णीच्या कामासाठी कोटीने खर्च काम मात्र शून्य नागरिकांना डांसाचा त्रासतर आहेच नागरिकांच्या पैशाची निव्वळ उधळपट्टी चालू आहे........

पवना व मुळा नदी सांगवी,गुरव पिंपळे,पिंपळे निलख,दापोडी,फुगेवाडी येथिल सर्वच ठिकाणी जलपर्णीत वाढ व डासांचा प्रादुर्भाव झाल्याने हैराण झालेत ...
मागील काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलने केली.आमच्यावर गुन्हेही दाखल झाले व ते आजही मोरवाडी कोर्टात पिंपरीत केस चालू आहे. 
गेली १५ वर्ष याविषयीच पाठपुरावा करून काम करून घ्यावे लागते ठेकेदारांमार्फत काम होत नाही म्हणून पाठपुरावा करून काळ्या यादीत टाकण्यात आले, नोटीसा काढल्या,दंडात्मक कारवाई केली,अमानत रक्कम जप्त केल्या पण अधिकारी व ठेकेदार मिलेजुले भगत आहे.कोणाचाही दबाव नाही.आत्ता लवकरात लवकर नागरिकांना या जलपर्णी काढून डांसापासून मुक्त करावे यासाठी दिनांक १६/३/२०२१ रोजी निवेदनही दिले याचे पोस्टाद्वारे आम्हाला दिनांक १९/३/२०२१ रोजी संमधित विभागाने लेखी उत्तरही मिळाले काही दिवस सर्व यंत्रण लावली पवना नदीवर मनसेच्यावतिने पाहणी केली जेमतेम दोन दिवस काही काम दिसले पण नंतर काही यंत्रण गायब झाली.मुळा पवना नदीचा बोपोडी संगमपासून सांगवी ममता नगर ते मधुबन सोसायटी स्पासर पुल पुढे पिंपळे निलख जवळपास ११ किलोमिटर पर्यत नदीने जलपर्णीचा हिरवा गालीछा पाघरला आहे. पण येथे मनपाने जलपर्णीचे काम दिलेल्या ठेकेदाराकडून एकही दिवस काम झालेले नाही .कागदी घोडे हसवण्याचे काम प्रशासन करत आहे.मनपाने लवकरात लवकर विचार करावा तसेच याची प्रशासनाने नोंद घ्यावी नागरिकांना डासांचा अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.असे VBP NEWS सोबत बोलताना राजू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष 
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment