लोक जनशक्ती पार्टी सह दिव्यांग सेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख व कोल्हापूर प्रतिष्ठान प्रमुख श्री. विकी मल्होत्रा यांच्या आई सौ. सुगंधा संजय कांबळे (मल्होत्रा) यांचे दि. 23 मार्च 2021 रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 51 वयाच्या होत्या. तीन वर्षांपासून त्यांना लकव्यानं ग्रासलं होत.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ सुगंधा या स्वभावाने कडक पण मनमिळाऊ सुद्धा होत्या.
शिवण कलासेस च्या माध्यमातून त्यांनी राजारामपुरी भागातील शेकडो तरुणींना स्वतःच्या पायावर उभे करून व्यवसाय उपलब्ध करून दिला. तसेच बचत गट, वार्षिक महिला भिशी चालवून अनेक महिलांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उंचावली. 'कांबळे बाई' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौ सुगंधा यांनी स्वयंसिद्धा, भगीरथी महिला संस्था आशा संस्थेत महिलांसाठी उल्लेखनीय काम केले होते.
आई कडून मिळालेल्या सामाजिक कार्याची आवड श्री विकी मल्होत्रा यांनी अखंडित पणे सुरु ठेवली. सामाजिक कार्य, जनसेवा, नेतृत्व व उत्कृष्ट वक्तृत्व असे गुण रक्तातूनच विकी मल्होत्रा यांना आई कडून लाभले.
त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री संजय कांबळे, दोन विवाहित मुली व मुलगा विकी असा परिवार आहे..
आयुष्य ताठ मानेने जगण्याची व जगवण्याची अखंड प्रेरणा म्हणून आई कायम हृदयात राहील अशी आदरांजली श्री विकी मल्होत्रा यांनी आईला वाहिली.
आईच्या दुःखाचा 12 वा दिवस शनिवार दि. 03/04/2021 रोजी सकाळी फोटो पूजन असल्याने सर्व नातेवाईक, मित्रमंडळी व हितचिंतक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन विकी मल्होत्रा यांनी केले आहे.व
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी कोल्हापूर मा सौ रेणुताई पोवार यांनी शोक व्यक्त करून त्यांच्या पवित्र आत्म्याला ईश्वर चरणी शांती लाभावी अशी प्रार्थना केली आहे.


No comments:
Post a Comment