Breaking

Friday, 2 April 2021

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे- जनस्वराज्य सेनेचा क्रांती मजदूर सेनेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा.


दि. १/४/२०२१
जनस्वराज्य सेनेचा जाहिर पाठिंबा...

गोरगरीब कामगारांच्या मेहनतीच्या किमान वेतनाच्या (ESI, PF ) १२१ कोटी रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या पुणे प्रशासनाविरूद्ध गेले २६ दिवस क्रांती मजदूर सेनेचे नेते अर्जुन ओहाळ व त्यांचे सहकारी पुणे महानगरपालीकेच्या दारात ठिय्या आंदोलन करत आहेत, क्रांती मजदूर सेनेच्या सर्व मागण्या रास्त आहेत. त्यांना जनस्वराज्य सेनेचे प्रमुख मा. राहुल प्रताप यांच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. प्रफुल्ल गुजर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष मा. फय्याज पाशा व इतर मान्यवर उपस्थित होते. असे  VBP NEWS सोबत बोलताना क्रांती मजदूर सेनेचे राहूल प्रताप यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment