Breaking

Monday, 19 April 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- अन्नछत्र मंडळाच्या वतीने गेल्या दोन दिवसात गरजू 650 जणांना अन्नदान.


अन्नछत्र मंडळाच्या वतीने गेल्या दोन दिवसात गरजू 650 जणांना अन्नदान
जयहिंद फुड बँकेचे सहकार्य
अक्कलकोट, दि, 19 प्रतिनिधी
श्रीं स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पूत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि जयहिंद फूड बँक यांच्या सहकार्याने सध्याच्या संचारबंदीच्या काळात गेल्या दोन दिवसात गोरगरीब, गरजू, बेघर अशा 650 गोरगरीब, गरजू, बेघर, वंचित जणांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन भात, आमटी, शिरा वाटप करण्यात आले.
अन्नछत्र मंडळाच्या या उपक्रमामुळे गोरगरीब, गरजू, बेघर, वंचितातून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी देखील कडक लॉकडाऊनच्या काळात न्यासाने सेवा रूजू केलेली होती. आज देखील जयहिंद फूड बँकेच्या सहकार्याने सदरचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कर्म हेच देव मानुसकी हाच धर्म, देशातल्या प्रत्येकाच रक्षण हेच कर्तव्य, हा नारा घेऊन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून जयहिंद फूड बँकेचे सर्व सदस्य ‘चला संचारबंदीच्या काळात हातभार लाऊया’ देव, धर्म देश यांच्या सेवेसाठी आम्ही समर्पित हा नारा देत संपूर्ण श्री क्षेत्र अक्कलकोटात गोरगरीब,गरजू लोकांना अन्नदान करण्यात येत आहे. 
शहारातील स्टेशन रस्त्यावरील डी.एड. कॉलेज पाठिमागे असलेली झोपडपट्टी व परिसर यासह वडार गल्ली, ग्वल्ल, ढाले, मोरे वस्ती, संजय नगर, झोपडपट्टी व परिसर, खासबाग गल्ली, श्री साई समर्थ चौक आदी ठिकाणी अन्नदान करण्यात आले.
या कामी जयहिंद फुड बँकेचे अंकुश चौगुले, अशोकराव जाधव, योगेश पवार, हिरा बंदपट्टे, अतिश पवार, महेश निंबोळे, आकाश चौगुले, मुदसर तांबोळी, ओंकार कांबळे, सिध्दू लव्हारे, प्रज्वल पाटोळे, विकास पवार, महेश भोसले हे परिश्रम घेत आहेत.
गरजूंनी भ्रमनध्वनी 9960662424, 9403487898, 8208065494, 8007114499, 7058327557 यावर संप्रक साधण्याचे आवाहन अतिश पवार यांनी केले आहे.
सदरचे वाटप हे कोविड -19 चे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन जयहिंद फूड बँकेची टिम करीत आहेत.

No comments:

Post a Comment