Breaking

Monday, 19 April 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - कुर्डूवाडीत कोविड सेंटर रूग्णालय सुरू करण्याची आरपीआयची मागणी.


भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - कुर्डूवाडीत कोविड सेंटर रूग्णालय सुरू करण्याची आरपीआयची मागणी- याबाबत वृत्त असे की 
कोरोना या भयानक आजारावर उपाययोजना करण्यासाठी कोरेना  हॉस्पिटलची व्यवस्था करणे बाबत  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी  करमाळा  विधानसभा मतदारसंघ चे आमदार संजय मामा शिंदे यांना निवेदन दिले आहे व  कुर्डूवाडी शहरामध्ये कोरेना हॉस्पिटल सेंटर उभारणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवेची इमारत उपलब्ध आहे त्या ठिकाणी  अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त हॉस्पिटल ची उभारणी झाल्यास रुग्ण व नागरिकांना ची हेळसांड होणार नाही. तात्काळ कुर्डूवाडी या ठिकाणी कोरोना हॉस्पिटल सेंटर ची उभारणी करावी ही मागणी केली आहे. यावेळी  Rpi जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे. नितीन आखाडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment