Breaking

Saturday, 2 January 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- अवैधरित्या वाळू साठा व उपसा करणार्या बोटींवरती कारवाई.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- अवैध्य वाळू उपसा करणार्या बोटींवरती कारवाई- याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवेढा तालुक्यातील मुढवी येथील माण नदी पात्रात अवैधरित्या वाळू साठा व उपसा करणार्या बोटींवरती मंगळवेढा प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात  आली यामध्ये दि.1/1/2021 रोजी सकाळी 11:30, च्या सुमारास महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मुढवी येथील माण नदी पात्रात अवैधरित्या वाळू साठा व उपसा करणार्या बोटी आढळून आल्याने सदरच्या बोटींवरती कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईत नदीपात्रात लगत अंदाजे 50 ब्रास वाळूसाठा आढळून आला असून तो जेसीबी व टिपरच्या साहाय्याने तहसील कार्यालयाच्या आवारात आणून टाकण्याचे काम चालू आहे. 
सदर कामी खालील मंगळवेढा तहसीलदार व मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक व पथकाने कारवाई केली. 
यामध्ये मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे, सर्कल पोळके, सर्कल बनसोडे, हुलजंती तलाठी एकतापुरे, तलाठी जीरापुरे, तलाठी लोखंडे, तलाठी रायभान, तलाठी चव्हाण, कोतवाल लोंढे, पोलिस पाटील कुचेकर, तसेच मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक ज्योतिराम गुंजवरे, सहा.पो.निरिक्षक भगवान बुरसे, पोहेकाॅ दयानंद हेंबाडे ब.न.1697, पोहेकाॅ संतोष चव्हाण ब.न.505, पोहेकाॅ श्रीमंत पवार ब.न.1621, पोहेकाॅ प्रविण सावंत ब.न.1967, पोहेकाॅ कृष्णा जाधव ब.न.926, पोहेकाॅ प्रकाश नलावडे ब.न.590. या पथकाने संयुक्त कारवाई केली.

No comments:

Post a Comment