*मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार विना मास्क वाहन चालवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणारे महापालिकेचे सॅनेटरी इन्स्पेक्टरच ‘विनामास्क’.*
*सोलापूर:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती केली असून विनामास्क आढळून आल्यास किंवा विनामास्क प्रवास करताना आढळून आल्यास पाचशे रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात महापालिकेचे सॅनेटरी इन्स्पेक्टर व त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांच्या मार्फत विना मास्क प्रवास करताना दंणात्मक कारवाई केली जाते.
मास्क नसल्यास संबंधित नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल केला जातो.
दंडापोटी शासनाच्या तिजोरीमध्ये दररोज हजारो रुपये महसुल जमा होतात.
कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी तज्ज्ञांनी ज्या उपाययोजना सुचविलेल्या आहेत .
त्यांची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनाकडून केली जात आहे.
कोरोना विषाणू गरीब, श्रीमंत, अधिकारी, कर्मचारी असा कोणताही भेदभाव करत नाही.
ज्याच्या संपर्कात जाईल त्या व्यक्तीस कोरोनाची बाधा होते.
वाहनावर विना मास्क प्रवास तपासणी करणारे काही महापालिकेचे सॅनेटरी इन्स्पेक्टर व त्यांच्या सोबतचे कर्मचारी मात्र यासाठी अपवाद असल्याचे दिसून येते.
महापालिकेचे सॅनेटरी इन्स्पेक्टर अधिकाऱ्यांना कोरोना होणार नाही किंवा त्यांच्यापासून इतर नागरिकांना त्रास होणार नाही असा काही प्रकार सोलापूर शहरात दिसून येतो.
सोलापूर महापालिकेचे सॅनेटरी इन्स्पेक्टर स्वतः मास्क न वापरता नागरिकांना मास्क न वापरल्याने दंड आकारतात हा खूप मोठा विरोधाभास आहे.
महापालिकेतील स्वच्छता व विना मास्क संबंधी नियंत्रण करणारे सॅनेटरी इन्स्पेक्टरव त्यांच्या सोबत असणारे कर्मचारीच कायद्याचे पालन करत नसून दिवसभरात हे सॅनेटरी इन्स्पेक्टर व त्यांचे कर्मचारीच शेकडो लोकांच्या संपर्कात येत असतात त्यामुळे मास्क न वापरल्याने त्या सॅनेटरी इन्स्पेक्टर व कर्मचार्यांना कोरोना होण्याचा फारच मोठा धोका असून त्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांच्या जीवितास सुधा धोका निर्माण होत आहे.
स्वच्छता विषयी भाष्य करणारे सोलापुर महानगरपालिकेचे प्रत्येक प्रभागातील सॅनेटरी इन्स्पेक्टरच बेजबाबदारपणे वागत नसतील आणि या बेजबाबदारपणामुळे स्वतःचा आणि सरळ मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना अडवून नागरिकांचा जीव धोक्यात घालत असतील तर अशावेळी मास्क न वापरणाऱ्या महापालिकेचे सॅनेटरी इन्स्पेक्टर व त्यांच्या सोबतचे कर्मचारीच पुर्ण मास्क का लावला नाही ?
मग सोलापुर महानगरपालाकेचे सॅनेटरी इन्स्पेक्टर व त्यांच्या सोबत असणार्या कर्मचार्यांना विचाराचे धाडस करणार कोण ?
असा सवाल शहरातील त्रस्त नागरीक करत आहेत.
तर त्या नागरिकाच्या मनाची अवस्था काय होत ?
असेल याचा विचार न केलेलाच बरा.
सर्रास रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सर्व शासकीय कार्यालयाची अवस्था पाहता शासकीय कार्यालयातच नियम पायदळी तुडवले जात आहेत.
मात्र सर्व शासकीय कार्यालयात जाऊन दंडात्मक कारवाई करण्याचे धाडस केल्याचे कुठेही दिसून येत नाही.
मग मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार असा सवाल उपस्थित होतो.


No comments:
Post a Comment