Breaking

Sunday, 21 March 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी.


*महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी*         
     माढा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळी माढा तालुक्याचे  नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाआघाडी सरकार च्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून धनंजय मुंडे प्रकरण असो कि नुकतेच झालेले पुजा चव्हाण प्रकरण या मध्ये गृहखात्याची प्रतिमा मलीन झाली आहे त्यातच गृह खात्यामध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असून महाविकास आघाडी ही सरकार चालवण्यासाठी अपयशी ठरलेली आहे. महाआघाडी सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे घडत आहेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असे विधान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या गृह खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा यासाठी माढा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने नायब तहसिलदार लोकरे यांना निवेदन देण्यात आले यां वेळी तालुका भाजपा अध्यक्ष योगेश बोबडे, भाजपा  युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री उमेश पाटील, ओबीसी मोर्चा चे बाळासाहेब ढगे, मदन मुंगळे, सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष श्री सुरेश पाटील, माढा तालुका युवा सरचिटणीस श्री गिरीश तांबे, संग्राम देशमुख, सुहास देशमुख, विनायक लोंढे, भरत मस्के, बालाजी गायकवाड, सुहास सरडे, मुकुल वाघ,  अमित करंजकर, रुषिकेष सातारकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.

No comments:

Post a Comment