*रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापुर व आर्यनंदी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने छोट्या व्यवसायिकांना दहा हजार रुपये ( बिनव्याजी ) मदत*
कोरोना-या संकट काळामुळे छोट्या व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या व्यवसायाची घडी ही विस्कळीत झालेली आहे अशावेळी *आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेतून* रोटरी क्लब जुळे सोलापूर मदतीने आर्यनंदी पतसंस्थेच्या माध्यमातून या छोट्या व्यवसायिकांना मदत करीत आहोत असे प्रतिपादन पतसंस्थेचे चेअरमन डॉ. राजेश कुमार फडकुले यांनी केले.
या कार्यक्रमाला आर्यनंदी पतसंस्थेचे चेअरमन *डॉ. राजेश कुमार फडकुले व जनता बँकेचे नुतन सदस्य रोटे आनंद कुलकर्णी , रोटे ॲड. प्रदीप सिंह रजपुत, रोटे राजेश पवार व रोटे पुरुषोत्तम उडता व क्लब चे अध्यक्ष सचिन चौधरी या प्रमुख अतिथींच्या हस्ते अकरा व्यवसायिकांना चेक वाटप* करण्यात आले.
*भाग्योदय नाष्टा सेंटर हे एका व्यवसायिकांनी चालू केलेल्याचे उद्घाटन देखील यावेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले*. *चहा टपरी व्यवसायिकांना , बांगडी व्यवसाय करणाऱ्या महिला , कटिंग दुकानदार , रिक्षा चालक* अशा विविध व्यवसायिकांना यात समाविष्ट केले होते . प्रातिनिधिक स्वरूपात *यावेळी 20 व्यवसायिकांची निवड* करण्यात आली. भविष्यात लवकरच *अजून शंभर व्यवसायिकांची निवड करून जुळे सोलापुरातील छोट्या व्यावसायिकांना रोटरी क्लब तर्फे आधार मिळेल अशी भावना अध्यक्ष सचिन चौधरी* यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी सौ शातां हेळंबकर , डॉ सौ शिल्पा फडकुले , संचालक निलेश एखंडे वसुली अधिकारी सतीश शिंदे संचालक प्रवीण बुर्से , डॉ. सुरेश व्यवहारे, रवी पाटील , माऊली झांबरे व क्लब चे सदस्य उपस्थित होते .
कार्यक्रमाची *प्रस्तावना डॉ. सुरेश व्यवहारे* यांनी केली तर *सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अध्यक्ष सचिन चौधरी* यांनी केले


No comments:
Post a Comment