Breaking

Friday, 26 March 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार- लाच घेताना पकडल्या गेल्या नायब तहसीलदार.


लाच घेताना रंगेहात पकडल्या गेल्या नायब तहसीलदार- याबाबत वृत्त असे की  उस्मानाबाद-  लॉक डाऊन काळात आलेले मोफत धान्य वाटप केल्याच्या बदल्यात रेशन दुकानदारांना त्याचा मोबदला म्हणून एका क्विंटल च्या मागे दीडशे रुपये प्रमाणे शासनाकडून बिल दिले जाते मात्र रेशन दुकानदारांना हे बिल मिळण्यासाठी सहा हजार सातशे रुपयाची लाच घेतल्याची घटना घडली आहे सदर लाच घेतल्याप्रकरणी नायब तहसीलदार यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून सदर कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे तीन महिन्याचे 44 हजार 623  रुपये बिल काढण्यासाठी लाच मागितली होती तक्रार केलेल्‍या रेशन दुकानदारांचे तीन महिन्याचे बिल काढण्यासाठी सदर लाचेची मागणी करण्यात आली होती रेशन दुकानदाराचे 44 हजार 623 रूपये बिल काढण्यासाठी 6 हजार 693 रूपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती त्यातील सहा हजार सातशे रुपये स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे राज्य सरकारने प्रत्येक रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप केले होते कोरोना काळात लॉकडाउन दरम्यान लोकांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारने प्रत्येक रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप केले होते या धान्याचे मोफत वाटप केल्याच्या बदल्यात दुकानदार यांना मेहनताना स्वरूपात कमिशन देण्याचा निर्णय घेत काही रक्कम दिली मात्र ही रक्कम वाटप करताना त्यात कमिशन मागणाऱ्या नायब तहसीलदार व रेशन दुकान संघटनेचे अध्यक्षासह एकास उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे तक्रारदार यांच्याकडून बिलाच्या रकमेचे पंधरा टक्के रक्कम मागण्यात आली होती तक्रारदार यांच्याकडून बिलाच्या रकमेचे 15 टक्के म्हणजे 6 हजार 693 रुपये लाचेची मागणी करून आरोपी डोंगरे यांच्यामार्फत पंचांसमक्ष ही लाचेची रक्कम स्वीकारलेने कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे कळंब तहसील कार्यालय येथील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार श्रीमती परवीन उमर दराज खान पठाण वय 47 वर्ष यांच्यासह कळंब तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग साधू डोंगरे वय 64 वर्षे राहणार कोथळा तालुका कळंब स्वस्त धान्य दुकानदार विलास ज्ञानोबा पिंगळे वय 55 वर्ष राहणार पाथर्डी तालुका कळंब या तीन जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि.उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलिस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी केली आहे, याकामी त्यांना पोलिस अंमलदार इप्तेकर शेख, विष्णू बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य, अर्जुन मारकड, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.

No comments:

Post a Comment