पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- परिचारक समर्थकांसमोर धर्मसंकट, उमेदवाराला मते मिळाली नाहीत तर जबाबदार कोण? - या बाबत सविस्तर वृत्त असे की 2009 च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदार संघ राखीव झाल्याने विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला परंतु आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादीतील फुट टाळण्यासाठी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून विजय दादांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्यास सहमती दिली मात्र घडले उलटेच पंढरपूर शहरावर वर्चस्व असून देखील बाहेरील उमेदवार नको म्हणून शहरातून स्वर्गीय आमदार भालके यांना जनतेने मताधिक्य दिले मात्र याचे खापर फोडले गेले ते परिचारक समर्थक व काही नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांवर खापर फोडत अकलूजकर भलतेच नाराज झाल्याची चर्चा त्यावेळी झाली होती स्वर्गीय सुधाकर पंतांनी राष्ट्रवादीसाठी केलेला हा त्याग वाया गेला आणि शेटफळ येथील सभेत दिलेल्या शब्दांमागे ज्येष्ठ नेत्यांनी राजकीय पुनर्वसन केले नाही आणि पुढे परिचारक राष्ट्रवादीतून बाहेर पडले आता 2009 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होत असून आमदार प्रशांत परिचारक यांना भाजपासाठी त्याग करावा लागतो की काय सध्या अशी परिस्थिती या पोटनिवडणुकीत निर्माण झाली आहे तर परिचारक यांच्याशिवाय भाजपने दुसरा उमेदवार दिला आणि पंढरपूर शहर व बावीस गावात आमदार प्रशांत परिचारक यांच्या अपेक्षेप्रमाणे आपल्या भागातून भाजपच्या उमेदवारास मते मिळाली नाही तर मालकांच्या नाराजीचा सामना करावा लागेल अशी धास्ती ही अनेक नगरसेवक व पुढाऱ्यांनी घेतल्याची चर्चा आहे पंढरपूर शहर व तालुक्याच्या राजकारणात परिचारक व भालके हे दोन प्रबळ गट गेल्या बारा वर्षापासून संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे जवळपास 26 वर्ष पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक गटाचे वर्चस्व राहिले आहे तर तालुक्यातील पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटात परिचारक पुढे राहिले आहेत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती ह्या परिचारक समर्थकांच्या ताब्यात आहेत याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा दूध संघ जिल्हा बँक आणि जवळपास सर्वच गावच्या सोसायट्या परिचारक समर्थकांच्या ताब्यात आहेत त्यामुळे परिचारक गटाची शहर व तालुक्यात मोठी राजकीय ताकद असल्याचे दिसून येते त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जुने निष्ठावंत स्वर्गीय औदुंबर आण्णा व विठ्ठल परिवारास दूर लोटत परिचारक यांना जवळ केले होते मात्र 2009 मध्ये राष्ट्रवादीत तिडा पडला आणि जा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी तिडा पडला होता त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास भाग पाडण्यात स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले होते त्यामुळेच विजय दादांची नाराजी दूर करण्याच्या हेतूने स्वर्गीय सुधाकरपंत आपली हक्काची उमेदवारी त्यांना बहाल केली आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजयदादांनी निवडणूक लढवली पंढरपूर शहर व तालुक्याच्या राजकारणावर परिचारक गटाचे असलेली मजबूत पकड लक्षात घेऊन विजयदादांनी त्या वेळी निवडणूक लढविली खरी परंतु अगदी नदीच्या घाटांची नावे बदलली जातील या पासून सुरू झालेली चर्चा अकलूज च्या दरबारी राजकारणाच्या सुरस कथांनी व्यापून गेली आणि सामान्य मतदारांनी आपला माणूस भला म्हणून स्वर्गीय आमदार भालके यांना मतदान केले त्यावेळी खरे तर परिचारक समर्थक नगरसेवक आणि गाव पुढारी यांनी नेटाने प्रयत्न केले होते पण जनतेने नाकारले आता पुन्हा 2009 ची पुनरावृत्ती 2021 च्या पोटनिवडणुकीत होईल आणि जसा राष्ट्रवादीसाठी त्या केला तसा भाजपसाठी करावा लागला आणि आपल्या भागातील मतदारांनी पर्यायी उमेदवार नाही रूचला तर करायचे काय? याच संकटात पुन्हा त्याग करण्याच्या चर्चेने धास्तावलेले अनेक परिचारक समर्थक असल्याचे दिसून येते.
Saturday, 27 March 2021
Home
/
पंढरपूर
/
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- परिचारक समर्थकांसमोर धर्मसंकट, उमेदवाराला मते मिळाली नाहीत तर जबाबदार कोण?
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- परिचारक समर्थकांसमोर धर्मसंकट, उमेदवाराला मते मिळाली नाहीत तर जबाबदार कोण?
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment