सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पोषण आहारातून चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, झेडपी सदस्य धाईंजेंचा आत्मदहनाचा इशारा, सीईओंनी काढली दोन पत्रे- याबाबत वृत्त असे की खुल्या पोषण आहारातील भ्रष्टाचाराची नियुक्त चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी व दोषींवर कारवाई न करताच बिले वितरित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत, त्याविरोधात जिल्हा परिषदेचे सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी बुधवारी आत्मदहन करीत असल्याचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले. त्यानंतर सीईओंनी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून त्यानंतरच बिल अदा केले जाईल, तत्पूर्वी आपण आत्मदहनासारखे पाऊल उचलू नये, अशी विनंती केली आहे. जिल्हा परिषद सदस्य धाईंजे यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप स्वामी यांनी दोन पत्रे काढली, पहिल्या पत्रानुसार त्यांनी संबंधित संस्थेला दिले जाणारे पोषण आहार बिल चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत थांबवावे आणी याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ मार्गदर्शन करावे, अशी विनंती एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांना लिहले आहे. तर दुसर्या पत्रानुसार त्यांनी धाईंजे यांना आत्मदहन करू नये, अशी विनंती केली आहे.
Wednesday, 31 March 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पोषण आहारातून चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, झेडपी सदस्य धाईंजेंचा आत्मदहनाचा इशारा, सीईओंनी काढली दोन पत्रे.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पोषण आहारातून चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, झेडपी सदस्य धाईंजेंचा आत्मदहनाचा इशारा, सीईओंनी काढली दोन पत्रे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment