Breaking

Wednesday, 31 March 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मनाला चटका लावणारी बातमी, जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांचे निधन.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मनाला चटका लावणारी बातमी, जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांचे निधन- याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्हा परिषदेचे कामती गटाचे सदस्य तानाजी खताळ यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी सकाळी निधन झाले, अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे खताळ कुटूंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे, खताळ हे सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी जवळ  असलेल्या हाॅटेल जयशंकर चे मालक होते, त्याच ठिकाणी त्यांचे निवासस्थान असल्याने ते सकाळी उठून झोपाळ्यावर बसले, तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 
मृत्यूसमयी त्यांचे वय 55 होते, त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुले व नातवंडे असा परिवार आहे, लांबोटी गावचे ते दहा वर्षे सरपंच होते, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे ते कट्टर समर्थक होते, भीमा लोकशक्ती परिवार गटातून ते जिल्हा परिषद कामती गटातून विजयी झाले होते, जयशंकर हाॅटेल, लांबोटी चिवडा आणी चहासाठी त्या मार्गावरील प्रसिद्ध असे हाॅटेल आहे. तानाजी खताळ यांच्या मातोश्री रूक्मीणीबाई यांनी मोठ्या कष्टातून ते हाॅटेल उभे केले आहे, रूक्मीणीबाई खताळ यांचा मोठा मुलगा तानाजी गेल्याने खताळ कुटूंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

No comments:

Post a Comment