Breaking

Wednesday, 31 March 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/प्रसाद दप्तरदार- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक ही भावनिक मुद्यांवर लढली जाणार.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक ही भावनिक मुद्यांवर लढली जाणार- याबाबत वृत्त असे की दिवंगत आमदार भारत यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडून भगीरथ भालके तर भाजप कडून समाधान आवताडे यांच्या दोन नेत्यात लढत होणार आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करायचा कालचा शेवटचा दिवस असून भाजपचे समाधान आवताडे आणी महाविकास आघाडी चे राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी भारत नाना भालके यांचे सारखा पेहराव करून राष्ट्रवादी कडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावरून पंढरपूरची ही पोटनिवडणुक भावनिक मुद्यांवर लढली जाणार असे सध्या चित्र आहे. यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी आज नाना आपल्यात नाहीत हे माझं कौटुंबिक दु:ख आहेच पण ज्या जनतेने नानांवर मनापासून प्रेम केलं त्यांना यापुढे नानांच्या विचारांची गरज आहे, म्हणून निवडणूकीच्या मैदानात उतरलो आहोत, माझा फक्त देह आहे बाकी माझ्या नसा नसात नानांचे रक्त आहे. असे भावनिक वक्तव्य यावेळी भगीरथ भालके यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता मामा भरणे, आ.प्रणितीताई शिंदे, आ.संजय मामा शिंदे, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे स्थानिक मुद्यांवर मोर्चेबांधणी करणार्या समाधान आवताडे यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आवाहन वाटत नाही, त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असा दावा केला आहे. समाधान आवताडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.गोपीचंद पडळकर, आ.प्रशांत परिचारक, राम शिंदे, आ. सुभाष देशमुख, सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment