Breaking

Sunday, 21 March 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- भगीरथ भालके यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी द्यावी....संजय पवार.


*भगिरथ भालके यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी द्यावी* ..... *संजय पवार*.
मंगळवेढा ( दि. 20 ) *स्व.आ. भारतनाना भालके यांची अपुरी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी व पंढरपूर* ... *मंगळवेढा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा नेते भगिरथदादा भालके यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या सर्व  प्रमुख नेत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मरवडे येथील स्वाभिमानी ग्रामाविकास आघाडीचे गटनेते संजय पवार यांनी दिली* .
       स्व. भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होत असून त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात वेगवेगळ्या घडामोडींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ना.अजितदादा पवार , ना. जयंत पाटील हे रविवार दि. 21 रोजी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत .
        त्या अनुषंगाने मरवडे ग्रामपंचायतीला स्मार्टग्राम पुरस्कार मिळवून देऊन संपूर्ण *सोलापूर जिल्ह्यात विकासकामांच्या बाबतीत  मरवडे गावचा लौकिक निर्माण करणारे  मरवडे ग्रामपंचायतीचे गटनेते संजय पवार हे 2009 च्या पहिल्या निवडणूकीपासून भालकेप्रेमी कार्यकर्ते म्हणून संपूर्ण मतदारसंघात ओळखले जातात*.  
      स्व.भारतनानांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी व रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी भगिरथ भालके यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
        *गेल्या अकरा वर्षापासून स्व. भारतनाना यांनी विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केले. या संपूर्ण कालावधीत मतदारसंघातील प्रत्येक गावातील वाडीवस्तीपर्यंत भगिरथदादांचा वावर असून त्यांना मतदारसंघातील प्रश्नांची संपूर्ण जाण आहे . त्यामुळे अन्य कुठलाही पर्याय जनतेला अथवा कार्यकर्त्यांना अपेक्षित नाही म्हणूनच प्रत्येक बैठकीत त्यांच्या नावावर एकमुखी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे* .
        स्व. भारतनाना यांच्या पश्चात *मतदारसंघावर पकड मिळविण्याचे मनसुबे ठेवून असलेली नेते मंडळी भगिरथ भालके यांना मिळणारा सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद पाहून हतबल झाली असून नानाविध पद्धतीने पक्षनेतृत्वापुढे वस्तुस्थितीचा विपर्यास करीत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे .
         त्याचबरोबर *पक्षाच्या नावावर स्वतःची दुकानदारी थाटलेल्या आणि विविध मार्गाने स्वार्थ साधणार्या मंडळींना देखील पक्षातील मक्तेदारी सुरु ठेवण्यासाठी स्वयंभू व सक्षम नेतृत्व म्हणून जनसामान्यांचे पाठबळ असलेल्या भगिरथदादांची अडचण होत असल्याने दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरल्या जात असून त्यात कुठलेही तथ्य नाही* . म्हणूनच मतदारसंघाच्या विकासासाठी , रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि आगामी काळासाठी एक शाश्वत ...दमदार नेतृत्व उभे करण्यासाठी भगिरथ भालके यांनाच महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे . या निवेदनावर मरवडे गावातील अनेक आजी माजी पदाधिकार्यांच्या स्वाक्षरी आहेत .

No comments:

Post a Comment