नेत्याला तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांची जाळपोळ,
रास्तारोको!
निवडणुका म्हणजे कोणत्याही राज्यासाठी मोठा राजकीय इव्हेंट असतो.
त्यामध्ये नेतेमंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे शक्तीप्रदर्शन करत असतात.
पण हे करताना अनेकदा ही मंडळी कायदा-सुव्यवस्था हातात घेताना दिसतात.
पश्चिम बंगालमध्ये सध्या तसाच काहीसा प्रकार दिसून येत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
यामध्ये अनेक आतल्या गोटातल्या आणि ममता दीदींच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या इच्छुक उमेदवारांची तिकिटं कापली गेली.
लगेच त्याचे पडसाद या इच्छुकांच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या निषेधामध्ये दिसू लागले.
ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या एकूण २९१ उमेदवारांची नावं जाहीर केली.
मात्र, यामध्ये दक्षिण २४ परगणामधील भानगर भागातले पक्षाचे इच्छुक नेते अराबुल इस्लाम यांना तिकीट नाकारण्यात आलं.
त्याचा इस्लाम यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून निषेध तर केलाच, पण त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क पक्ष कार्यालयातील सामानाची जाळपोळ करायला सुरुवात केली.
पक्षाच्या नेतनहाट भागातील कार्यालयातल्या लाकडी खुर्च्या अराबुल इस्लाम यांच्या कार्यकर्त्यांनी तोडून त्यांची होळी केली.
तसेच, रस्त्याच्या मध्येच ही जाळपोळ करत रस्ता देखील अडवून धरला.
अशाच प्रकारे दोन वेळेस आमदार राहिलेले रफिकुर रहमान या विद्यमान आमदारांचं तिकीट देखील ममता दीदींनी यंदा कापलं.


No comments:
Post a Comment