माजी रणजी क्रिकेटपटूने ९ कंपन्यांना ४० लाखाला लुटले.....
एका २५ वर्षीय व्यक्तीने स्वत:ला के. टी. रामाराव या तेलंगणाच्या मंत्र्याचा सचिव भासवून नऊ कॉर्पोरेट कंपन्यांना सुमारे ४० लाख रुपयांना फसविले.
रामाराव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या नावाखाली त्याने हे पैसे उकळले. या व्यक्तीला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली.
बुडुमुरु नागराजू हा एम.बी.ए. असून त्याने २०१४ ते २०१६ दरम्यान रणजी करंडक स्पर्धेत आंध्र प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील या तरुणाला यापूर्वी २०१८ ते २०२० दरम्यानच्या दहा प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि सध्या इतर नऊ प्रकरणासंदर्भात अटक केली आहे.
त्याच्याविरूध्द २०२१ मध्ये रुग्णालये, रियाल्टर्स आणि शैक्षणिक संस्थांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल आहेत.
पत्रकारांना संबोधित करताना हैदराबादचे पोलिस आयुक्त अंजनी कुमार म्हणाले की, आरोपीने कॉर्पोरेट कंपन्या, कॉर्पोरेट रुग्णालये, रियाल्टर्स, शैक्षणिक संस्थांना गुगलवर उपलब्ध असलेल्या फोन नंबरवर फोन करत असे. स्वत:चा परिचय मंत्री के.टी. रामाराव यांचा खाजगी सचिव बंडारी तिरुपती म्हणून करून देत असे.
मंत्री रामाराव हे तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत असे लोकांना सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत असे.
शपथविधी सोहळ्यासाठी एल.बी. स्टेडियममध्ये कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी तो लोकांकडून पैशाची मागणी करत असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व करत होता तेव्हा नागराजूला प्रायोजकत्व मिळत असल्यामुळे तो विलासी जीवनशैलीच्या आहारी गेला.
क्रिकेटमध्ये आता जास्त सक्रिय नसल्याने त्याने कॉर्पोरेट कंपन्यांना विलासी जीवन जगण्यासाठी लक्ष्य करण्याची योजना आखली.


No comments:
Post a Comment