Breaking

Monday, 8 March 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- पालकमंत्री सतेज पाटील यांनी 15 कोटींची लूट केली...धनंजय महाडिक.


पालकमंत्री सतेज पाटील यांनी १५ कोटींचा घरफाळा लूट केली,
 भा.ज.पा.चे माजी खासदार धनंजय महाडिक......
 
पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार, संचालक असलेल्या पंचतारांकित सयाजी हॉटेल, 
डी. वाय. पी. मॉल या संकुलाची घरफाळा आकारणी बेकायदेशीर केली आहे.
 त्यांच्या ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कचा घरफाळा १३ वर्षांपासून थकीत आहे. 
पालकमंत्र्यांनी महापालिकेतील सत्तेचा वापर करून सुमारे १५ कोटी रुपयांची आर्थिक लूट केली आहे, असा आरोप भा.ज.पा.चे नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला. 
महाडिक म्हणाले, महापालिकेने घरफाळा, पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित केली आहे. पण दुसरीकडे महापालिकेतील धनदांडगे व राजकीय नेते यांच्या मिळकतींना घरपट्टी आकारणी केलेली नाही. 
महापालिका हद्दीतील २० हजार घरफाळा मिळकतींची अजिबात घरफाळा आकारणी केली जात नाही. 
यातील उदाहरण म्हणजे सतेज पाटील यांच्या सयाजी हॉटेल, डी.वाय.पी. हॉस्पिटॅलिटी येथे घरफाळा आकारणी करणाऱ्या आणि चौकशी करणाऱ्या यंत्रणेला नियंत्रित करून फाळा रक्कम कमी दाखवलेली आहे. 
त्यांच्या डी.वाय.पी. मॉल मध्ये ३० मोठ्या मिळकती आहेत.
 त्या स्वतः वापरतो असे त्याने दाखवून फाळा कमी लावला आहे.
 तसेच, त्यांच्या ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क या मिळकतीचा फाळा १९९७ पासून १ कोटी थकीत आहे.
 सुमारे १५ कोटी रुपयांची आर्थिक लूट याद्वारे पालकमंत्री पाटील यांनी केली आहे. 
याची चौकशी महापालिकेने करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
 घरफाळा लुटणाऱ्या लोकांमुळे महापालिकेच्या आर्थिक तिजोरीला भगदाड पडले आहे.
 त्यामुळे नागरिकांनी घरफाळा भरून नये, असे आवाहनही महाडिक यांनी केले. 
यावेळी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, माजी महापौर सुनील कदम उपस्थित होते.

No comments:

Post a Comment