Breaking

Monday, 8 March 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- जिल्हा परिषदेतील 15 व विविध पंचायत समितींमधील 14 सदस्यांचे पद रद्द.


जिल्हा परिषदेतील १५ व विविध पंचायत समितींमधील १४ सदस्यांचे पद रद्द........
 
पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे, कृषी पशुसंवर्धन सभापती सुशील चूरी, महिला बालकल्याण सभापती अनुष्का ठाकरे, राष्ट्रवादीचे गटनेते नरेश आकरे यांच्यासह एकूण १५ जिल्हा परिषद सदस्यांचे पद रद्द झाले आहेत. 
याचबरोबर जिल्ह्यातील चार पंचायत समितीमधील १४ पंचायत समिती सदस्यांची पद देखील रद्द करण्यात आले आहे. 
पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण मिळाल्याने ही पदं रद्द करण्याचे आदेश मे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनंतर हे निर्देश काढले आहेत
मे.. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील १५ नागरिकांच्या मागास प्रवर्ग जागा रिक्त करण्याच्या आदेश जिल्हाधिकारी काढणार आहेत.
 याचबरोबरीने पालघर जिल्ह्यातील वाडा, पालघर, डहाणू व वसई तालुक्यांमध्ये असलेल्या १४ पंचायत समितीच्या जागा रिक्त करून नंतर सहा जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग व उर्वरित आठ जागांवर सर्वसाधारण उमेदवारांसाठी निवडणुका घेण्याचे निर्णय घेण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment